मिशन कोकण साम्राज्य
नाव: मिशन कोकण साम्राज्य
विषय: कोकणच्या सामर्थ्यांची ओळख
कोकण म्हणजे संधींचं उगमस्थान, पण त्याची जाणीव आपल्यालाच नाही!
कोकणाकडे पाहताना आपल्याला झाडं, डोंगर, समुद्र, नारळ, आंबा, मासे आणि पर्यटन दिसतं. पण खरं पाहिलं तर या सर्व गोष्टींमागे एक अफाट "सामर्थ्य" दडलेलं आहे जे रोजगार, उद्योजकता आणि प्रगती घडवू शकतं, पण आजही त्याचा पुरेपूर उपयोग होत नाही.
कोकणची खरी ताकद कोणती?
1. निसर्गसंपन्नता
– सह्याद्रीच्या कुशीत वसलेली ही भूमी भरपूर पावसामुळे शेतीसाठी योग्य आहे.
– जलस्रोत, जैवविविधता आणि पर्यावरणीय शुद्धता ही इथली नैसर्गिक देणगी आहे.
2. उत्कृष्ट कृषी उत्पादने
– हापूस आंबा, काजू, नारळ, पोफळी, कोकम, भात यांची देशात आणि परदेशातही मोठी मागणी आहे.
– जैविक शेती आणि नैसर्गिक प्रक्रियांसाठी कोकण सर्वात योग्य आहे.
3. पर्यटनाची अफाट शक्यता
– समुद्रकिनारे, किल्ले, जलप्रपात, घाटमार्ग – येथील पर्यटन हे वर्षभर सुरू ठेवण्यासारखं आहे.
– ग्रामीण पर्यटन, होमस्टे, अॅग्रो टुरिझमची नवी दिशा निर्माण करता येते.
4. संपन्न सांस्कृतिक परंपरा
– दशावतार, कोकणी भाषा, लोककला, खाद्यसंस्कृती हे सर्व जगात आकर्षण ठरू शकतात
– हाच सांस्कृतिक वारसा ब्रँडिंग आणि विपणनाच्या दृष्टीने वापरता येतो
5. श्रमशील आणि हुशार तरुण वर्ग
– अनेक कोकणातील तरुण शहरांत कार्यरत आहेत – पण त्यांचं कौशल्य गावाकडे वळवलं तर क्रांती होऊ शकते.
– शिक्षण, टेक्नोलॉजी, मॅनेजमेंट अशा अनेक क्षेत्रात कौशल्य असलेले लोक गावाकडे परतू इच्छितात फक्त दिशा आणि आधार हवा!
पण हे सर्व 'सामर्थ्य' केव्हा उलगडेल?
जेव्हा आपण ‘स्वतःकडे’ सकारात्मकपणे पाहू लागू,
जेव्हा आपण आपल्या मातीवर विश्वास ठेवू, आणि जेव्हा आपण एकत्र येऊन निर्णय घेऊ – कोकणला नव्याने घडवण्याचे.
उद्या भेटूया लेखमालेच्या पुढील भागात...
"कोकणातील तरुणांचा आत्मविश्वास – नव्याचा उदय"
मिशन कोकण साम्राज्य
श्री अजय आत्माराम यादव
संस्थापक/अध्यक्ष: कोकण बाजार,
कोकण विकास युवा मंच,
एम के एस अकॅडमी
AjayYadav #ajayrao
#kokanchashiledar
#missionkokansamrajya
#kokanvikasyuvamanch
#kokanbajar #mksacademy
#mindsetmaster
Comments
Post a Comment