आपल्या आयुष्याला कोण जबाबदार?"

"आपल्या आयुष्याला कोण जबाबदार?"

तुम्हाला कधी प्रश्न पडतो का? 
“माझं आयुष्य असंच का आहे?”
“संधी मिळत नाहीत…
समाज समजून घेत नाही…
नशीब साथ देत नाही…”

पण खरंच विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट होते – ती म्हणजे आपल्या आयुष्याची घडणं ही फक्त आणि फक्त आपल्यावर अवलंबून आहे.

1. आपला हेतू – (Intention)

तुम्ही आयुष्याकडे कोणत्या भावनेनं बघता?

हे फक्त जगणं आहे की काहीतरी घडवण्याची संधी?

हेच ठरवतं – तुम्ही किती खोलवर आणि किती प्रामाणिकपणे जगता.

2. आपले विचार व दृष्टीकोन – (Mindset & Vision)

तुमच्या आजच्या स्थितीपेक्षा तुमचा विचार तुम्हाला किती पुढं घेऊन जाऊ शकतो, हे महत्त्वाचं.
नकारात्मकता टाकून आशावादी आणि कृतीशील विचार ठेवा. कारण तुमचा दृष्टीकोनच तुमचं वर्तन ठरवतो.

3. आपली कृती – (Action)

विचार कितीही छान असले, तरी कृती नसेल तर आयुष्य बदलत नाही.
दररोज घेतलेलं एक छोटं पाऊलही तुम्हाला तुमच्या स्वप्नाजवळ घेऊन जातं. कर्तृत्वच आयुष्य बदलतं – तक्रारी नव्हे.

तर उत्तर स्पष्ट आहे –

"आपल्या आयुष्याला जबाबदार कोण?"

उत्तर – मी स्वतः!
– माझा हेतू
– माझे विचार
– माझी कृती

"नशीबाचं लिहून देणं थांबवा...
कर्माच्या लेखणीने स्वतःचं आयुष्य घडवा!"

AjayYadav #ajayrao
#kokanchashiledar
#missionkokansamrajya
#mindsetmaster #mksacademy
#thoughtleadership #जवाबदारीचेजीवन

Comments

Popular posts from this blog

मनाला जड नको, हलकं ठेवा!

मिशन कोकण साम्राज्य