"कौशल्याधारित करिअर – शिक्षणापेक्षा कौशल्य जास्त का महत्त्वाचं?"

#करिअर_मार्गदर्शन – भाग 6


"कौशल्याधारित करिअर – शिक्षणापेक्षा कौशल्य जास्त का महत्त्वाचं?"


आजचं जग डिग्रीवर नाही तर स्किलवर चालतंय. कितीही चांगली डिग्री असली तरी जर तुमच्यात काम करण्याचं कौशल्य नसेल, तर ती डिग्री उपयोगाची ठरत नाही.


याउलट, कमी शैक्षणिक पात्रता असलेल्या व्यक्तीलाही योग्य कौशल्य असल्यास यशस्वी होणं सहज शक्य आहे.


शिक्षण VS कौशल्य – फरक काय?


शिक्षण (Education) कौशल्य (Skill)


किताबी ज्ञान vs प्रत्यक्ष कृतीतले ज्ञान...


शिकून सर्टिफिकेट मिळतं पण कृतीने काम मिळतं. सिद्धांत शिकवतो पण प्रत्यक्ष कृती अनुभव देते. यश सर्वांनाच मिळू शकते. सराव आणि मेहनतीनं करिअर घडतं...


कौशल्याचे महत्त्व का वाढलंय?


1. उद्योगांना काम करणारे लोक हवे असतात – डिग्रीवालं नव्हे.


2. नवीन व्यवसायात कौशल्यांची गरज मोठी आहे – उदाहरणार्थ: डिजिटल मार्केटिंग, फोटोग्राफी, टेक्निकल सर्व्हिसेस.


3. कौशल्याच्या आधारे आत्मनिर्भरता येते – स्वतःचं काम करता येतं.


विद्यार्थ्यांनी कोणती कौशल्यं शिकावीत?


डिजिटल कौशल्ये: MS Office, Canva, Social Media Handling


तांत्रिक कौशल्ये: इलेक्ट्रिक, प्लंबिंग, रिपेअरिंग, मशीन ऑपरेशन


क्रिएटिव्ह कौशल्ये: फोटोग्राफी, ग्राफिक डिझाईन, व्हिडीओ एडिटिंग


व्यवहारिक कौशल्ये: संवादकौशल्य, टीम वर्क, निर्णयक्षमता


व्यवसायिक कौशल्ये: सेल्स, मार्केटिंग, अकाउंटिंग, कस्टमर डीलिंग


कुठे शिकता येईल?


ITI आणि कौशल्य विकास संस्था


ऑनलाईन कोर्सेस (YouTube, Udemy, Skill India Portal)


स्थानीय प्रशिक्षण केंद्रे व स्वयंसेवी संस्था.


डिग्री मिळाली तर पेपर मिळतो, पण कौशल्य असेल तर पैसा, प्रतिष्ठा आणि स्वतंत्रता मिळते.


पुढील भागात आपण पाहणार आहोत – "करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेली मनोवृत्ती – Mindset चे महत्त्व."


मिशन कोकण साम्राज्य

श्री अजय आत्माराम यादव

संस्थापक/अध्यक्ष: कोकण बाजार,

कोकण विकास युवा मंच,

एम के एस अकॅडमी

AjayYadav #ajayrao

#kokanchashiledar #missionkokansamrajya

#kokanvikasyuvamanch #kokanbajar #mksacademy

#mindsetmaster.

Comments

Popular posts from this blog

मनाला जड नको, हलकं ठेवा!

मिशन कोकण साम्राज्य

आपल्या आयुष्याला कोण जबाबदार?"