मनाचं संरक्षण – कोणते विचार स्वीकारायचे आणि कोणते टाळायचे?

#mindset – भाग 21
विषय: मनाचं संरक्षण – कोणते विचार स्वीकारायचे आणि कोणते टाळायचे?

जसे घराचं संरक्षण करतो आपण – कुलूप लावतो, काच बंद करतो, बाहेरचं धोकादायक आत येऊ नये यासाठी काळजी घेतो...

पण आपल्या मनाचं संरक्षण करतो का?
सतत बाहेरून येणारे विचार, मतं, तुलना, टीका, भीती यांचा मारा होत असतो. यातलं काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं हेच ठरवणं महत्वाचं. हीच खरी मानसिक सुरक्षा!


1. मन एक शेतीसारखं आहे – जे विचार पेराल, तेच उगम पावतील

– नकारात्मक, निराशाजनक, अपमानजनक विचार पेरले, तर मन थकलं-हरलं वाटेल
– सकारात्मक, प्रेरणादायी, आशावादी विचार पेरले, तर मन उभं राहतं.

Mindsetmatters, कारण मनात जे टाकता अथवा स्विकारता, तेच तुमच्या कृतीत उतरते.


2. कोणते विचार स्वीकारायचे?

– जे तुमच्या ध्येयाशी जुळतात
– जे तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला मदत करतात
– जे तुमचा आत्मविश्वास वाढवतात
– जे तुमचं मन सुसंगत ठेवतात


3. कोणते विचार टाळायचे?

– “आपल्याला जमणार नाही”
– “तो बघ कसा पुढे गेला, आपण कुठं आहोत?”
– “लोक काय म्हणतील?”
– “माझं नशीबच खराब आहे”

Mindsetiseverything – कारण विचार जर तुमच्या सोबत नाहीत, यशाच्या वाटेवर नेणारे नाहीत, तर ते आपल्यासाठी अडथळेच आहेत.


4. मनाचं संरक्षण करण्याचे 4 उपाय

1. नकारात्मक गोष्टींना मानसिक “NO ENTRY” द्या


2. दररोज सकस विचारांचं वाचन / श्रवण करा...


3. मनावर परिणाम करणारी माणसं ओळखा – गरज असेल तिथं अंतर ठेवा


4. स्वतःला रोज विचार करा – “हा विचार मला पुढे नेत आहे का मागे?”


आजपासून ठरवा – “माझं मन माझं मंदिर आहे. इथे कोणते विचार यावेत, हे मी ठरवेन – समाज, सोशल मीडिया किंवा भूतकाळ नव्हे.”
मनाची ही चावी आता तुमच्याच हाती आहे!

उद्या पाहूया – मनाचा खरा पोषण आहार कोणता?

मिशन कोकण साम्राज्य
श्री अजय आत्माराम यादव
संस्थापक/अध्यक्ष: कोकण बाजार,
कोकण विकास युवा मंच,
एम के एस अकॅडमी
AjayYadav #ajayrao
#kokanchashiledar
#missionkokansamrajya
#kokanvikasyuvamanch
#kokanbajar #mksacademy
#mindsetmaster #Mindsetmatters #Mindsetiseverything

Comments

Popular posts from this blog

मनाला जड नको, हलकं ठेवा!

मिशन कोकण साम्राज्य

आपल्या आयुष्याला कोण जबाबदार?"