मनाचं संरक्षण – कोणते विचार स्वीकारायचे आणि कोणते टाळायचे?
#mindset – भाग 21 विषय: मनाचं संरक्षण – कोणते विचार स्वीकारायचे आणि कोणते टाळायचे? जसे घराचं संरक्षण करतो आपण – कुलूप लावतो, काच बंद करतो, बाहेरचं धोकादायक आत येऊ नये यासाठी काळजी घेतो... पण आपल्या मनाचं संरक्षण करतो का? सतत बाहेरून येणारे विचार, मतं, तुलना, टीका, भीती यांचा मारा होत असतो. यातलं काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं हेच ठरवणं महत्वाचं. हीच खरी मानसिक सुरक्षा! 1. मन एक शेतीसारखं आहे – जे विचार पेराल, तेच उगम पावतील – नकारात्मक, निराशाजनक, अपमानजनक विचार पेरले, तर मन थकलं-हरलं वाटेल – सकारात्मक, प्रेरणादायी, आशावादी विचार पेरले, तर मन उभं राहतं. Mindsetmatters, कारण मनात जे टाकता अथवा स्विकारता, तेच तुमच्या कृतीत उतरते. 2. कोणते विचार स्वीकारायचे? – जे तुमच्या ध्येयाशी जुळतात – जे तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला मदत करतात – जे तुमचा आत्मविश्वास वाढवतात – जे तुमचं मन सुसंगत ठेवतात 3. कोणते विचार टाळायचे? – “आपल्याला जमणार नाही” – “तो बघ कसा पुढे गेला, आपण कुठं आहोत?” – “लोक काय म्हणतील?” – “माझं नशीबच खराब आहे” Mindsetiseverything – कारण विचार जर तुमच्या सोबत नाहीत, यशाच्या वाट...